मुंबई: भूक आणि कुपोषणाच्या नोंदी घेऊन जगभरातील विपन्नावस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या ताज्या अहवालाने भुकेच्या बाबतीत भारतात असलेल्या विदारक स्थितीचे जळजळीत वास्तव समोर आणले आहे. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून ‘उपासमारीचा देश’ ओळख मिटवण्यासाठी राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला एकत्र काम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
भारतापुरते बोलायचे तर ग्लोबल हंगर इंडेक्सचा हा अहवाल आपल्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. कारण भूक आणि उपासमारीच्या बाबतीत भारत नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानच्याही मागच्या रांगेत जाऊन बसला आहे. ‘उपासमारीचा देश’ ही ओळख आता मिटवावीच लागेल. राज्यकर्ते आणि समाजव्यवस्थेला हातात हात घालून त्यासाठी काम करावे लागेल.असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान 94 व्या, नेपाळ 73 व्या, श्रीलंका 66 व्या आणि बांगलादेश 88 व्या स्थानावर आहे. म्हणजेच उपासमारी रोखण्याच्या कामात या सर्व देशांच्या तुलनेत हिंदुस्थानची कामगिरी अत्यंत सुमार म्हणावी अशी आहे. दारिद्रय़ आणि गरिबीने जर्जर झालेल्या पापुआ न्यू गिनी (102), नायजेरिया (103), कांगो (105) आणि अफगाणिस्तान हे देश तेवढे भारताच्या (101) पुढे असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून पुढे आली आहे. अर्थात या विदारक परिस्थितीला केवळ राज्यकर्तेच जबाबदार आहेत असे नाही. आपल्या समाज व्यवस्थेतील दोषही उपासमारीच्या गंभीर समस्येला तेवढेच जबाबदार असल्याचे संजय राऊत यांनी सामनातून म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खेळाडूंसाठी ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय; शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

