बंगळूर – महाराष्ट्रातून कर्नाटकात रेल्वेनं जाणाऱ्या प्रवाशांना 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने एका पत्राद्वारे दक्षिणमध्य रेल्वेला तसं कळवलं आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी कर्नाटकातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यासाठी कोरोना अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सुद्धा अहवाल बंधनकारक असेल, असंही कर्नाटक सरकारनं स्पष्ट केलं आहे.
दुसऱ्या बाजूला राज्यात आणखी दहा रुग्णांना कोवीडच्या डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूची लागण झाल्याचा दुजोरा मिळाला आहे. या दहापैकी सहा रुग्ण कोल्हापूरचे, तीन रत्नागिरीचे, तर एक रुग्ण सिंधुदुर्ग इथला असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागानं काल स्पष्ट केलं. याबरोबरच राज्यात डेल्टा प्लस या नव्या आजारानं बाधित रुग्णांची संख्या 76 वर पोहोचली आहे.
राज्यात डेल्टा प्लस या आजारानं बाधित झालेल्या 76 पैकी 5 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भीती न बाळगता कोविड नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

