Share

RTOच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन, पावणेदोनशे नागरिकांचे रक्तदान

Published On: 

परभणी : रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात दुपारपर्यंत 175 जणांनी रक्तदान केले. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात व्याख्यानांसह परिसंवादांचेही आयोजन येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले. याशिवाय शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहनचालकांसह प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचाही स्तुत्य उपक्रम कार्यालयातर्फे घेण्यात आला. त्यापाठोपाठ बुधवारी (दि.तीन) महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबीराचे उद्घाटन चंद्रलामा अटोमोटिव्हचे संचालक प्रवीण मुदगुलगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे उद्धव देशमुख, न्यू लाईफ ब्लड बँकेचे संचालक पंकज खेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय इमारतीतील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबीरात 175 जणांनी रक्तदान केले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, अभिजीत वाघमारे यांनी दिली.

रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, अभिजित वाघमारे, कऱ्हाळे यांच्यासह प्रमोद जोगदंड, सुनील सवंडकर, गणेश टाक, कैलास भोरगे, बाळासाहेब राख, अल्ताफ खान, कलंदर खान पठाण, मृदुला खळीकर आदींनी प्रयत्न केले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!