Share

‘भारत हिंदूराष्ट्रच आहे या मतावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- भारत हिंदूराष्ट्रच आहे या मतावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाचा विजयादशमी उत्सव काल नागपुरातील रेशिमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला होता. जे भारतात राहतात, जे मुळ भारतीयांचे वंशज आहेत, जे राष्ट्र गौरवासाठी काम करतात, देशात शांतता नांदावी यासाठी प्रयत्नशील असतात आणि या देशातील बहुविधतेचा सन्मान करतात ते सारे हिंदू आहेत असंच संघ आजवर मानत आल्याचं भागवत यांनी यावेळी संघ स्वयंसेवकांसमोर केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं.

यावेळी बोलताना भागवत म्हणाले, अल्पसंख्यकांमध्ये भय निर्माण करण्यात येत असून एकमेकांमध्ये भेद निर्माण करून दुरी निर्माण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामागे काही विशिष्ट लोक आहेत. याचा प्रतिकार करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा आहे. पण त्याचा प्रामाणिकपणे आणि सक्तीने अंमल व्हायला हवा, असेही भागवत पुढे म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्दच भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही,असे वक्तव्य त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181868846765920259?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181860323352928256?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!