टीम महाराष्ट्र देशा – उद्या २२ मार्च रोजी कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केल आहे. भविष्यात पूर्ण लॉक डाऊन करण्याची वेळ येऊ शकते त्या दृष्टीने उद्याचा जनता कर्फ्यू ही रंगीत तालीम आहे असं बहुतांश लोकांचं म्हणण आहे.
पंतप्रधान मोदी यांनी उद्या कोणीही सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत बाहेर पडू नये. स्वयंशिस्त पाळावी असं आवाहन केलं आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र उद्या त्यांच्या दर रविवारी लागण्याऱ्या शाखा नेहमीप्रमाणे लागणार आहेत असं ट्वीटरवर म्हटलं आहे.
मात्र या शाखांची वेळ बदलून सकाळी ६:३० आधी आणि रात्री ९:३० नंतर अशी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या काळात म्हणजे सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत शाखा लागणार नाही.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्दी करू नका या आवाहनाला मात्र संघाकडून हरताळ फ्दासली जाणार असंच म्हणव लागेल.
https://twitter.com/RSSorg/status/1241231556674342912
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=vK5–X2kY2M
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

