Share

चारशे कोटींचा गडबळ घोटाळा! ईडीचा धडाका सुरूच, नागपुरात अनिल देशमुखांच्या कॉलेजवर छापा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये ईडीकडून छापेमारी सुरुच आहे. आज दुपारी ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातल्या फेटरी येथील कॉलेजवर धाड टाकली आहे. तसेच ईडीने नागपुरातल्या अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्याालयावर छापे टाकले. ईडीने काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या निवासस्थानीही छापासत्र राबविले होते. त्यानंतर आज त्यांच्या कॉलेजवर ही कारवाई सुरू आहे. साई शिक्षण संस्था ही तीच संस्था आहे की ज्याच्या खात्यावर चारशे कोटी रुपये हवालामार्फत जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनिल देशमुख या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा मोठा मुलगा सलिल हा या संस्थेवर उपाध्यक्ष आहे त्यांची पत्नी आरती देशमुखही या संस्थेच्या पदाधिकारी असल्याची माहिती आहे. अनिल देशमुख यांचा पीए म्हणून अनेक वर्षे काम पाहत असलेला कुंदन शिंदे हा देखील या संस्थेवर पदाधिकारी आहे. कुंदन आणि दुसरे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना यापूर्वीच ईडीने अटक केली आहे.

अनिल देशमुख यांना ईडीनं आजवर चार वेळा समन्स बजावलेत. तरीदेखील ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत? असा प्रश्न ईडीला पडला आहे. यासंदर्भात आता ईडीला सुप्रीम कोर्टाकडून दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!