चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना काही दिवसांपूर्वी पार पडला. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा भारताचा सलग चौथा पराभव ठरला आहे.
पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व हे विराट कोहलीनेच केले होते. त्यानंतर विराट कोहली पितृत्व रजा घेत माघारी परतला होता. उर्वरित तीन कसोटी सामन्यात संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणे याने सांभाळली होती. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताला दमदार विजय मिळाल्यामुळे अजिंक्यकडेच कसोटी सामन्यांचे कर्णधारपद सोपवावे अशी मागणी जोर धरू लागली होती.
हुशार नेतृत्व व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची रहाणेची वृत्ती निवड समितीतील सदस्यांनाही भावली असल्यानेच निदान कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला सोपवावे असाही विचार अनेक सदस्यांनी मांडलेला होता. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यानेही यामध्ये आपलं मत मांडलं आहे. कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, असं स्पष्ट मत पीटरसन यानं मांडलं आहे.
विराट कोहली कर्णधार असताना भारताने सलग चार कसोटी सामने गमावल्यामुळे त्याच्या नेतृत्वक्षमतेबाबत चर्चा ऐरणीवर आहे, परंतु कोहलीच्या नेतृत्वाला कोणताच धोका नसल्याचा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने केला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारती संघाने मागील वर्षी न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने गमावले, मग ऑस्ट्रेलियात अॅडलेड कसोटीत आणि इंग्लंडविरुद्ध चेन्नईत मानहानीकारक पराभव पत्करले. ‘‘भारताच्या कसोटी कर्णधार पदाबाबतची चर्चा टाळणे कठीण आहे, परंतु परिस्थिती बदलणार नाही,’’ असे पीटरसनने सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर ; भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात
- ‘भाजपने काव काव करायचे आणि राजपालांनी त्यांना चहापानास बोलवायचे ही कोणती घटनात्मक संस्कृती ?’
- समांतर च्या ठेकेदाराचा कोर्टात जाण्याचा इशारा; प्रकरण शासनाकडे सोपावणार मनपाचा निर्णय
- पुन्हा स्टेडिअमवर कलकलाट ! प्रेक्षकांच्या आगमनासाठी बीसीसीआय आतुर, शेअर केला व्हिडिओ
- ‘राज्यासह देशात काळा दिवस पाळण्यासारख्या अनेक घटना घडल्या त्यावेळी भाजप चूप बसला’


