Share

बाजारपेठा फुलू लागल्या! अडीच महिन्यांनी तुळशीबागेत पण गजबज

Published On: 

पुणे : तब्बल ७२ दिवसांच्या विरामानंतर दुकाने उघडण्यात आल्यामुळे राज्यभरात शहरांतील बाजारपेठा फुलू लागल्या. युवती आणि महिलांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या पुण्यातील तुळशीबाग परिसराने शुक्रवारी गजबज अनुभवली. नियम आणि अटींचे पालन करून दुकाने उघडण्यात आल्यानंतर महिलांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यामुळे विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

नांदेड जिल्हात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार करून शेतकऱ्यांची पिळवणूक -रयत

महापालिकेने सम आणि विषम तारखांनुसार दुकाने आणि पथारी व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी रस्त्याच्या एका बाजूची सव्वाशे दुकाने आणि शंभर पथारी व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडली.

तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित यांनी माहिती दिली कि, तुळशीबागेत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. दुकानातील कर्मचारी मुखपट्टी आणि हातमोजे यांचा वापर करत आहेत. ग्राहकांनी वस्तूला हात लावण्यापूर्वी त्यांना सॅनिटायझर दिले जात आहे, तर नियमानुसार दोन पथारी व्यावसायिकांमध्ये १५ फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. दुकानदारांना आठवडय़ातून तीन दिवस, तर पथारी व्यावसायिकांना दोन दिवस व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे, असे पंडित यांनी सांगितले.

राज्यभरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी :

मुंबई-ठाणे, नागपूर शहरांमध्ये सम-विषमबाबत संभ्रमामुळे रस्त्यांवर दुतर्फा दुकाने सुरू झाली. कोणती दुकाने कधी खुली ठेवायची याबाबतचे आदेश जारी करण्यात महापालिकांच्या काही विभाग कार्यालयांकडून झालेला विलंब, तर काही विभागांनी केलेले नियोजन दुकानदारांपर्यंत न पोचल्याने पहिल्याच दिवशी काही शहरांत संभ्रमाचे वातावरण होते. काही काळ त्यामुळे गोंधळ उडाला असला, तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंखेरीज खरेदी करता आली.

कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याला मिळाली राज्यसभेची उमेदवारी

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज भासत नसल्याने शुक्रवारी सकाळी आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या खासगी वाहनांची वर्दळ वाढली होती. शिळफाटा मार्गावरील वाय जंक्शन परिसरात अवजड वाहतुकीमुळे कोंडी झाली होती.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!