धुळे – आरपीआयला आगामी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा मिळायला हव्यात, अशी आशा आठवले यांनी व्यक्त केली. तसेच आम्हालाच वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. रामदास आठवले धुळ्यात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. याचाच अर्थ असा होतो की त्यांना पराभवाची चाहुल लागली असल्याची टीका देखील आठवले यांनी केली आहे.


