Share

रॉयल एनफिल्ड नव्या लूक सह लवकरच भारतीय बाजारात धडकणार

Published On: 

मुंबई : रोज नव्या बाईक्स बाजारात येत असल्या तरीही बुलेटची क्रेझ मात्र तसूभरही कमी झालेली नाही. श्रीमंत असल्याचं प्रतिक म्हणून आजही बुलेटकडे पाहिलं जात. मात्र सामान्य ग्राहकांना इच्छा असून देखील केवळ किंमत जास्त असल्यामुळे हि गाडी घेता येत नाही.

त्याचबरोबर तरुणाई मध्ये आणि बाईक रायडर्स यांच्या कडून विशेष पसंती असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड ही कंपनी आता भारतात एक लोकप्रिय बँड बनला आहे. भारतीय ग्राहक या कंपनीच्या बाईक्सची आतुरतेने वाट पाहात असतात.

त्यामुळे हार्डली डेविलस्न आणि रॉयल एनफिल्ड या दोन गाडयांमध्ये नेहमी चढाओढ असते. मागील काही काळापासून या गाड्यासांठी ग्राहकांची मोठी मागणी देखील वाढलेली दिसत आहे. त्यामुळे कंपनी रॉयल एनफिल्डला आता एका नव्या लुकसह बाजारात उतरवणार आहे. कंपनी नवीन रॉयल एनफिल्ड इंटरसेप्ट 650 आता भारतीय बाजारात आणणार आहे. यासाठी कंपनीने बुकींग सुद्धा चालू केलं आहे. राॅयल इनफिल्ड कंपनी लवकरच भारतात आणखी एक नवीन सिरीज भारतात लाँच करणार आहे. यामध्ये क्लासिक 350 चे पुढील व्हर्जन तर नवीन 650सीसी क्रुझरचा समावेश असणार आहे. तर येत्या काळात या गाड्या इलेक्ट्रिक पर्यायासह उपलब्ध केल्या जाणार आहे.

रॉयल एनफिल्ड इंटरसेप्ट 650 मध्ये ग्राहकांना दोन नवीन सिंगल टोन पेंटचा ऑप्शन भेटणार आहे. कॅनन रेड आणि वेंचुरा ब्लु अशा दोन पेंटचा ऑप्शन असेल. तर या आधी गाडी ऑरेज क्रश आणि बेकर एक्सप्रेस रंगात उपलब्ध होती. या गाडीचा क्रोम पर्याय मध्ये कंपनीने बदल केले आहे. तर मार्क थ्री आणि सिल्वर स्पेक्टर कलर बंद करण्यात येणार आहेत. मात्र रॉयल एनफिल्ड इंटरसेप्ट 650 च्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात 648 सीसीची पॅरेलल ट्विन मोटर देण्यात येणार आहे. जी 47.65 पीएस पाॅवर आणि 52 एनएम पीक टाॅर्क जनरेट करते. यासारख्या नवीन फिचर्समुळे गाडी आणखी आकर्षक झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!