🕒 1 min read
मुंबई : अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शनाया कपूरला दिग्दर्शक-निर्माता करण जोहर लॉन्च करणार आहे. शनायाला लॉन्च करण्याची घोषणा करताच करण जोहरवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून युजर्सनी करणवर निशाणा साधला. अशावेळी संजय कपूर करणच्या बाजूने मैदानात उतरला. शनायाच्या लॉन्चसाठी धर्मा प्रॉडक्शनशिवाय बेस्ट काहीही नाही, असे संजय कपूरने अगदी ठासून सांगितले.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय कापूरला अॅक्टिंग डेब्यूबद्दल विचारण्यात आले. त्यावर संजीव कपूर म्हणाला, मी वडील म्हणून मी खूप खुश आहे. माझी मुलगी शनाया अॅक्टिंग डेब्यू करतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
दरम्यान, शानायाच्या लॉन्चिंगसाठी धर्मा प्रॉडक्शनच का असे विचारण्यात आले त्या वर ते पुढे म्हणाले, करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन अनेक स्टारकिड्ससाठी लॉन्च पॅड राहिले आहे. आणि आता शनाया या कंपूत सामील झाली आहे. शनाया कपूरसाठी धर्मा प्रॉडक्शनशिवाय बेस्ट दुसरे काहीही असू शकत नाही.’
https://www.instagram.com/tv/CMtZef_g73P/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी शनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. शरन शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, अंगद बेदी महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; दिल्लीत कायदेशीर मद्यपान करण्याचे वय आता २५ वरून २१
- …तर टेस्ला कंपनी बंद करणार एलन मस्क यांची भूमिका
- वाळू माफियाकडून दीड लाखाची लाच घेताना तहसीलदार अटकेत
- आणखी दोन दिवस राज्यात पाऊस बरसणार, बळीराजाच्या चिंतेत वाढ
- राष्ट्रपती राजवटीची मागणी तर महिन्यातून दोन-तीन वेळा होते,त्यात नवीन काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

