परभणी: जिंतूर येथील पंचायत समितीतील कक्ष अधिकारी बुलबुले यांना शुक्रवारी महिलांना त्रास देण्याच्या कारणावरुन निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या स्थानिक सुत्रांनी दिली आहे. बुलबुले यांच्यावर लागलेल्या आरोपाबाबत घेतलेल्या ठोस निर्णयामुळे पंचायत समितीच्या गटामध्ये या कारवाईमुळे महिलांना त्रास देणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मात्र चांगला चाप बसला असल्याची चर्चा दिवसभर जिंतूरसह जिल्हाभरात होती.
जिल्हा परिषदेची शुक्रवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेस जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह इतर अधिकारी, जिल्हा परिषद सभापतींच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. जिंतूर येथील पंचायत समितीत कक्ष अधिकारी बुलबुले यांच्याविरुद्ध सहकारी असलेल्या महिलांना त्रास दिल्याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या.
आलेल्या सर्व तक्रारींची चौकशी करून शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी त्या कक्ष अधिकार्यास निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील अन्वये ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मराठवाड्यासाठी खुशखबर या दोन नवीन रेल्वे गाड्या सुरु होणार
- कोरानाच्या काळात पोलिसांची काळजी घेण्यात सरकार अपयशी
- ‘न्याय मागण्यासाठी गेलो तर पोलिसांनी कुत्र्यासारखे हाकलून लावले’
- विद्यार्थी सुविधा केंद्राची परीक्षा विभागात स्थापना
- डाळी शंभरीत गेल्याने महिलांचे आर्थिक गणित कोलमडले


