Share

सरकारच्या या उरफाट्या धोरणाचा धिक्कार असो- गोपीचंद पडळकर

Published On: 

मुंबई : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आल्याने आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच सागर बंगल्याबाहेर देखील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच सरकारच्या या उरफाट्या धोरणाचा धिक्कार असो, असेही पडळकर म्हणाले आहेत.

यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राष्ट्रद्रोह्यांशी संबंधित आरोपी मंत्र्याला वाचवणाऱ्या, भ्रष्टाचाराच्या गटारीत बुडालेल्या या आघाडी सरकारचे एक एक प्रकरणं पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर काढलेत. पण भ्रष्टांवर कारवाई करण्याऐवजी देवेंद्रजींनाच नोटीस दिले जाते.’

दरम्यान, याचा अर्थ या सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सरकारच्या या उरफाट्या धोरणाचा धिक्कार असो, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!