🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड या उभय संघात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत १४ टी-२० लढती झाल्या आहे. यापैकी दोघांनी प्रत्येकी ७ मध्ये विजय मिळवला आहे.
टी-२० मालिकेत इंग्लंड चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-१ने पराभव केला होता. त्यामुळे आता टी-२० मध्ये विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याच बरोबर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
या मॅचआधी टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने दिलासादायक बातमी दिली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बॉलिंगपासून लांब असलेला हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध ऑल राऊंडर म्हणून मैदानात उतरणार आहे, असं रोहितने सांगितलं. ‘टी-20 सीरिजमध्ये हार्दिक बॉलिंग करेल, टीमलाही त्याच्याकडून अपेक्षा आहे. पाठीच्या ऑपरेशननंतर हार्दिक बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी करेल आणि टीमसाठी मोलाचं योगदान देईल,’ असा विश्वास रोहितने व्यक्त केला.
‘हार्दिक भारतीय टीमचा महत्त्वाचा घटक आहे. तो बॉलिंग आणि बॅटिंगवर काम करत आहे. टी-20 आणि वनडे सीरिजला तयार होण्यासाठी त्याने टीमसोबत चांगला वेळ घालवला आहे. पांड्याने स्वत:कडून सगळे प्रयत्न केले, त्यामुळे तो आता सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहे. मागच्या काही आठवड्यांमध्ये त्याने बॅटिंग आणि बॉलिंगवर मेहनत घेतली आहे,’ असं रोहित म्हणाला. दुसरीकडे टेस्ट क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला ऋषभ पंत टी-20 टीममध्ये पुनरागमन करत आहे. या फॉरमॅटमध्येही पंत उत्कृष्ठ कामगिरी करेल, असा विश्वास रोहितने व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! येथे एलपीजी सिलिंडर बुक करा आणि मिळावा 100 रुपयांपर्यंत स्वस्त सिलिंडर
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
