टीम महाराष्ट्र देशा : एमएमआरडीएमार्फत मेट्रो 3 साठी कारशेड बांधण्यात येणार असून त्यासाठी आरेतील 2646 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. मात्र या वृक्षतोडीला मुंबईकरांनी विरोध दर्शवला आहे. तरीदेखील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरेतील वृक्ष तोड केली आहे. मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाने सध्या स्थगिती दिली आहे. प्रशासनाच्या या कृतीचा मुंबईकरांनी निषेध केला आहे. तर आता भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ट्विट केले आहे.
”जीवनाश्यक वस्तूचं असं नुकसान करणं चुकीचं आहे. मुंबईतील वातावरण संतुलित ठेवण्यात आरेचा महत्त्वाचा वाटा आहे. असं असूनही आपण तिथे वृक्षतोड कशी करू शकतो, शिवाय तेथील वन्यजीवांच्या अस्तित्वाचं काय?”, असा सवाल रोहितने विचारला आहे.
Even if there is more to the story, nothing is worth cutting down something so vital. Part of Mumbai being slightly greener & slight difference in the temperature is mainly because of #AareyColony. How can we take that away, not to mention thousands of animals will displace.
— Rohit Sharma (@ImRo45) October 8, 2019
दरम्यान आरेमधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली आहे. याप्रकरणी जोपर्यंत पर्यावरणविषयक खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आरेमधील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. आरेमधील झाडे तोडायला नको होती, असे सांगत सर्वोच्य न्यायाालयाने या प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांची तत्काळ सुटका करा, असे आदेश दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

