Share

बुरे दिन हे तुमच्याच अहंकाराच फळ, आत्ता तरी सुधरा राव, रोहित पवारांचा आशिष शेलारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : ”राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात ६० तर दुसरे म्हणतात ५० जिंकू…आहेत त्या आठ टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!, असे म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिशन २०२२ वर हल्लाबोल केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तितक्याच तोडीला तोड उत्तर दिले आहे.

ट्वीट करत रोहित पवार यांनी त्यांना उत्तर दिले आहे. ”भारतीय जनता पक्षाचे सुरवातीला दोन खासदार होते. आज केंद्रात फक्त तुमच्या पक्षासाठी आलेले ‘अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले ‘बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे. आत्ता तरी सुधरा राव.” असे म्हणत त्यांनी आशिष शेलारांना टोला लगावला आहे.

तसेच, दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत, असे आवाहन अजित पवार यांनी काल केले होते.पवारांच्या या विधानाची आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटद्वारे खिल्ली उडवली होती. आता रोहित पवार यांनी त्याला ट्वीट द्वारे उत्तर दिले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!