नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच असून एकूण रुग्णांचा आकडा ३९ लाखांपार गेला आहे. त्यामुळे अनलॉक-४ जरी आजपासून देशभरात लागू होणार असले तरी नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत असून तब्बल ८३ हजार ३४१ हुन अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, १ हजार ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सद्या ८ लाख ३१ हजार १२४ ऍक्टिव्ह केसेस असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत ३० लाख ३७ हजार १५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण ६८ हजार ४७२ रुग्ण मृत्यू पावले आहेत.
राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोना
दरम्यान, गेल्या २४ तासांत ६६ हजार ६५९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून काल १८ हजार १०५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, १३ हजार ९८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता पर्यंत ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
प्रश्नोत्तराच्या तासासाठी विरोधक आक्रमक तर सरकार निर्णयावर ठाम


