🕒 1 min read
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या चार सामन्यांटी कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेनंतर १२ मार्चपासून हे दोन्ही संघ पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १९ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२१ च्या दृष्टीने संघ निवडकर्त्यांनी खेळाडूंची निवड केली आहे.
भारताच्या या १९ सदस्यीय संघाची कमान विराट कोहलीच्या हाती सोपवण्यात आली आहे. सोबत निवडकर्त्यांनी अशा काही खेळाडूंना संधी दिली आहे, ज्यांची चाहते आणि क्रिकेट तज्ञ फार काळापासून वाट पाहात होते. तर दुसरीकडे काही प्रतिभाशाली खेळाडू, जे स्वतला टी२० क्रिकेट स्वरुपात सिद्ध करू शकले नाही. याचबरोबर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी दिलेली आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली आहे.
तर राहुल तेवतिया याच्या निवडीने सर्वांचा आश्चर्यांना धक्का बसला आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्त्व करणारा हा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही माहीर आहे. गतवर्षी शेल्डन कॉट्रेलच्या एका षटकात ५ षटकार मारत त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. तसेच आपल्या लेग स्पिन गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररणाने त्याने निवडकर्त्यांना प्रभावित केले होते.
एकीकडे काही गुणवंत खेळाडूंना टी२० संघात प्रवेश मिळाला आहे, दुसरीकडे काही प्रतिभाशाली खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. भारताचा विस्फोटक फलंदाज संजू सॅमसन याला मागील काळातील खराब प्रदर्शनामुळे संघाबाहेर करण्यात आले आहे. तर मनिष पांडेची टी२० क्रिकेटमध्ये ४४.३१ अशी उल्लेखणीय सरासरी असतानाही त्याची निवड करण्यात आली नाही. गोलंदाजांमध्ये चायनामन कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांनाही बाहेर बसवण्यात आले आहे. सोबतच राहुल चाहरही संघाबाहेर आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल. राहुल, शिखर धवन, श्रेयश अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक , रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन, वाय. चहल, वरुण चक्रवर्थ्य, अक्षर पटेल, डब्लू . सुंदर , आर. तेवतीया, टी.नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप, शार्दुल ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक; जालन्यात संपूर्ण गाव सील; परभणीत आठवडी बाजार बंद
- इंतजार खतम : अखेर भारतीय संघात ‘सूर्य’ तळपणार ; सुर्यकुमार यादवची टी20 संघात निवड
- सातारा-देवळाई कोरोना हॉटस्पॉट?
- फोन टॅप होत असल्याचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करून दिली माहिती
- जालनेकरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोना वाढतोय; शनिवारी तिघांचा बळी; ७० नवे रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
