अहमदनगर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी ही घोषणा केली.
‘ई पीक’ पाहणी प्रारंभ तसेच श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा नियोजन समिती व आमदार निधीतून उभारलेल्या हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प तसेच शंभर ऑक्सिजन बेड विस्तारित कोविड वॉर्ड व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन होते.
थोरात म्हणाले, की शेतकरी हिताचे अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकार घेत आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील अनेक अनावश्यक नोंदी काढल्या जाणार आहेत. सातबाऱ्यासोबत ‘आठ अ’ देखील ऑनलाइन मिळणार आहे. सातबाऱ्यावर जे काही व्यवहार होतात त्यावेळी त्याला फेरफार पडतो त्यावर क्लिक केले की नंतरचे सर्व फेरफारही ऑनलाइन मिळणार आहे. खरेदी खताची नोंदही महिनाभरात कशी होईल याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ‘ई-पीक’ पाहणी उपक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा. त्यामध्ये कोणत्या भागात कोणते पीक कमी जास्त आहे याचा गोषवारा उपलब्ध होणार आहे.
महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत ७/१२ नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला असून आता २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीपासून या सुधारित ७/१२ उताऱ्याची पहिली प्रत मोफत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. pic.twitter.com/leDCBUTllK
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 30, 2021
राज्याच्या महसूल विभागाने ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीने जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे.
खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहित व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच दिला जाणार आहे. खाते उताराची ही पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाईल. महसूल विभागातील कोतवाल, तलाठी त्यासाठी विशेष मोहीम गांधी जयंतीपासून सुरू करणार आहेत. खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच उतारा देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

