औरंगाबाद : राज्यात सोमवारपासून (दि. ७) पासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होत असून यात जिल्ह्याची वर्गवारी कोणत्या स्तरानुसार करायची यासाठी रविवारी (दि.6) जिल्हा आपत्ती प्राधिकरकंणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार औरंगाबाद महानगरपालिका पहिल्या स्तरात आल्याने हद्दीतले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
तर ग्रामीण भागात तिसरा सत्र असल्यामुळे मात्र अद्यापही काही प्रमाणात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व आस्थापना सुरु राहणार असून शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असेल, असे आदेश रविवारी जिल्हाधिकारी चव्हाण, पोलीस आयुक्त गुप्ता, मनपा आयुक्त पांडेय, पोलीस अधीक्षक पाटील यांच्या स्वाक्षरीनिशी जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरी भागात मात्र निर्बंधाना पूर्णपणे शिथिलता देण्यात आल्याने अत्यावश्यक वगळता इतरही सर्व आस्थापना या पूर्णवेळ उघड्या ठेवण्याची मुभा मिळाल्याने बाजारपेठेत रविवारपासूनच उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.
• अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने – अत्यावश्यक सेवा आणि व्यवसायाची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उघडी राहतील.
• इतर सर्व व्यवसाय व दुकाने – अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उघडता येतील.
• मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहे – औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्णपणे बंद असतील.
• रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी – महापालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी सोमवार ते शुक्रवार सकळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्केच्या क्षमतेने उघडी राहणार असून त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी केवळ पार्सल सेवा देता येणार आहे.
• विवाह समारंभ प्रसंगी केवळ ५० लोकांची उपस्थिती तर अंत्यविधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे.
• कृषी संबंधित बाबी या संपूर्ण आठवडाभर चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर बांधकाम साईटवर निवासी असलेल्या मजुरांना परवानगी आहे. बाहेरून मजूर आणण्याचे असल्यास अशा मजुरांना केवळ सायंकाळी चार वाजेपर्यंत काम करण्याची मुभा आहे.
• जीम / सलुन / ब्युटी पार्लर / स्पा / वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्केच्या क्षमतेने चालवता येईल.
• सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहिल. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील.
• आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार , टॅक्सी , बस) व रेल्वेने पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहील. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. तथापि जर प्रवासी लेवल ५ मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई – पास आवश्यक राहील.
• जमावबंदी/संचारबंदी – ग्रामीण भागात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी लागू राहणार आहे.
• सदरचे आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत टीम इंडिया उठवणार ‘या’ गोष्टीचा फायदा!
- महाराष्ट्र सावरतोय ; राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं, अहवालातून धक्कादाय माहिती आली समोर
- लिंब, बेहडा, बांबू, ताम्हणसह औरंगाबाद मनपाने केली १० हजार वृक्षांची लागवड
- कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

