Share

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का २६ नगरसेवकांसह ३०० कार्यकर्त्यांचा राजीनामा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : यंदाच्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेची युती असली पक्षांतर्गत नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक मतदार संघातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात बंडखोरांमुळे स्थानिक पातळीवरील वाद विकोपाला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून नाराज असलेल्या कल्याण-डोंबवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.

विधानसभेची उमेदवारी शिवसेनेचे स्थानिक नेता धनंजय बोडारे यांना मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र जागावाटपात ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे बोडारे समर्थकांची नाराजी समोर आली आहे. त्यामुळे बोडारे यांच्या समर्थनार्थ सर्वांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे तिकीट वाटपावरून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसत आहे. या नाराजीमुळे शिवसेनेच्या अडचणीही वाढल्या आहेत.

ठाण्यात एकूण १८ मतदार संघ आहेत. यातील काही अपवाद वगळता प्रत्येक मतदार संघातील शिवसेना आणि भाजपातील कार्यकर्त्यांमधील दुरावा स्पष्ट दिसत आहे. त्यात बोडारे यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड दुखावले गेले आहेत. बोडारे हे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. शिंदे यांचे पाठबळाशिवाय बोडारे बंड करणे शक्यच नाही, असा गायकवाड समर्थकांनी दावा केला आहे. त्यामुळे बोडारे यांनी बंडखोरी करताच गायकवाड यांनी थेट पालकमंत्र्यांवर टीका करायला सुरवात केली आहे. त्यानंतर शिवसेना अजून ताकदीने बोडारे यांच्यामागे उभी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1182192781801865221?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182198209382207489?s=20

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!