Share

‘आरक्षण हा फक्त राजकारणाचा विषय; नोकऱ्याच नाहीत, आरक्षण कुठून देणार?’, गडकरी यांचे रोखठोक वक्तव्य खंत

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : ‘आपल्या देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकऱ्याच नाही तर त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे,’ असे रोखठोक मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात व्यक्त केले.

वनराई फाउंडेशनच्या वतीने कमानी ट्यूब्जच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी गडकरी म्हणाले, तंत्रज्ञानामुळे रोजगार व पैसा मिळतो. येणारा काळ हा ड्रोन तंत्रज्ञानाचा आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक होऊ शकतो आणि त्याचा कोणत्याही जात, पंथ, धर्म, भाषेशी संबंध नाही. व्यक्तीच्या चांगुलपणाचा व गुणवत्तेचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे महाविद्यालये आहेत, पण उद्योजकता शिकवणाऱ्या संस्था नाहीत. प्रत्येकाला शाळा किंवा कॉलेज हवे हसते. दुसरा व्यवसाय करण्याची तयारी नसते. डॉ. सरोज यांच्यासारख्या यशस्वी उद्योजिकेने दलित समाजातील १०० तरुणींना उद्योजक म्हणून घडवावे. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित होईल, असेही गडकरी म्हणाले.

दरम्यान, मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आरक्षण कुणामुळं गेलं हे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. मोर्चे आणि विभागीय मेळावे सुरू आहेत. खासदार संभाजीराजे भोसले यांनी नुकताच या मुद्द्यावरून राज्य सरकारला इशारा दिला आहे व पुन्हा आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मांडलेलं मत महत्त्वाचे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!