🕒 1 min read
नवी दिल्लीः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या दरम्यान उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती त्यामध्ये चार चाकी वाहनांचे उद्योगाला मोठा ब्रेक लागला होता. मात्र आता या प्रक्रियेनंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे.
भारतातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, महिंद्र एण्ड महिंद्र, मर्सिडिज बेन्झ आणि फियाट क्रिसलेर यांनी आपण कोरोनामुळे कार उत्पादन थांबवत असल्याचं सांगितलं होत.
त्यांनतर वाहन उद्योग रुळावर आला असून वाहन खरेदी कडे ग्राहकांचा कल देखील वाढला आहे. तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला. रेनोने रेनो किगर ही एक स्वत कार लाँच करणार आहे. नुकतीच लाँच करण्यात आलेली निसान मॅग्नाइटने आपली किंमत आणि फीचर्सच्या जोरावर बाजारातील ग्राहकांना आकर्षित केले आहे. काही आठवड्या पूर्वी याची विक्री सुरू करण्यात आली आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्हीने सब चार मीटर स्पेसमध्ये अनेक कारची लाँचिंग असल्याने यात मोठी स्पर्धा पाहायला मिळते. परंतु, या कारचे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे की, ही कार स्वस्त कार असू शकते. आता या सेगमेंटमध्ये आणखी एक एसयूव्ही एन्ट्री लेवलसाठी तयारी केली जात असून या कारचे नाव रेनो किगर आहे.
काही दिवसांपूर्वी रेनोने आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा एक टीजर जारी केला होता. यानंतर किगरच्या कॉन्सेप्ट मॉडलला शोकेस केले होते. रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, याचे प्रोडक्शन व्हर्जन पुढील वर्षीच्या सुरुवातीला पोहोचू शकते.
एक स्पोर्टी डिझाईन लँग्वेज सोबत आपल्या जागतिक रेंजच्या प्रोडक्ट्स आणि फ्यूल एफिशिएंट तीन सिलेंडर पॉवर ट्रेने ने स्टाइल एलिमेंट्स घेतले आहे. त्यामुळे दावा करण्यात येत आहे की, रेनो किगर मध्ये प्रीमियम फीचर्स पाहायला मिळू शकतात. सनरूफ मिळणारी ही भारतातील सर्वात स्वस्त कार असू शकते. या फीचरला बहुतांश फॅमिली बेस्ड ग्राहकांची पसंती मिळत असते. रेनो आपल्या या कारला आणखी आकर्षक पद्धतीने लाँच करू शकते.
किगरची सुरुवातीची किंमत ५.२५ लाख रुपये असू शकते. याच्या टॉप मॉडलची किंमत १० लाख रुपये असू शकते. टॉप एन्ड व्हेरियंटला आठ इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्ह्यू कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट आदी फीचर्स दिले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘नंगा’ ऊंचा रहे हमारा; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट
- संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार
- ऑस्ट्रेलियाचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाला मिळाली सर्वात मोठी आनंदाची बातमी
- ‘रियलमी डेज’ सेल ची वेळ वाढवली ‘या’ स्मार्टफोन्स ७ हजारांपर्यंत सूट !
- ब्रँड शेतकरी : केरळच्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील आंदोलकांसाठी पाठवला अननसांचा ट्र्क
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
