🕒 1 min read
नवी दिल्लीः सध्या नवीन वर्ष आणि सनासुदींच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ऑफर आणि डिस्काउंट दिले जाता आहेत. यामध्ये आता मोबईल ग्राहकांसाठी रियलमी या स्मार्टफोन कंपनीने आकर्षक ऑफर आणल्या आहेत.
त्यामुळे आता तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी रियलमीने ‘रियलमी डेज’ सेल आणला आहे. या सेलमध्ये रियलमीचे प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे आता या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहेत.
तर आता रियलमीने ‘रियलमी डेज’ सेल ची वेळ वाढवली आहे. २८ डिसेंबर रोजी संपणारा हा सेल आता कंपनीने ३१ डिसेंबर पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रियलमीचे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन सोबत टीव्ही सुद्धा स्वस्तात खरेदी करता येवू शकते. रियलमीच्या फोनवर ७ हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. तर स्मार्ट टीव्हीवर सुद्धा जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे.
रियलमी डेज सेल रियलमी X50 Pro 5G स्मार्टफोन्सवर ७ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. रियलमीच्या या सेलमध्ये हा फोन केवळ ३४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. रियलमी X3 सुपरझूम फोनवर ४ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. याची किंमत २३ हजार ९९९ रुपये झाली आहे रियलमी X3 वर ३ हजारांची सूट दिली जात आहे. या सूटनंतर या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये झाली आहे.
रियलमी नार्झो 20 Pro सेलमध्ये १ हजार रुपयांची सूट मिळत आहे. यानंतर हा फोन १३हजार ९९९ रुपयांत मिळत आहे. रियलमी 6 आणि 6i वर २ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. यानंतर याची किंमत ११ हजार ९९९ रुपये झाली आहे. ‘रियलमी डेज’ सेल दरम्यान कंपनी रियलमी C15 आणि C15 क्वालकॉम एडिशन यासारख्या फोनवर १ हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
‘रियलमी डेज’ सेल दरम्यान स्मार्ट टीव्ही वर देखील सूट दिली जात आहे. रियलमीच्या ५५ इंचाच्या टीव्हीवर ३ हजारांची सूट मिळत आहे. यानंतर याची किंमत ३९ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत २२ हजार ९९९ रुपये झाली आहे. कंपनी यावर १ हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. रियलमीच्या ३२ इंचाच्या टीव्हीवर १ हजारांचा डिस्काउंट दिला जात असून १३ हजार ९९९ रुपये किंमत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’; स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम !
- भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय; कोहलीचे खास ट्विट
- ७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार
- ‘द फॅमिली मॅन सीझन 2’चे पोस्टर प्रदर्शित
- उद्या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
