Share

बनावट बांधकाम परवाना काढताय; सावधान! तुमच्यावरही होऊ शकते ‘अशी’ कारवाई

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड नगर परिषदेच्या बनावट बांधकाम परवानगी व नमुना ४३ बनवून फसवणूक केल्याचा प्रकार सिल्लोड येथे उघडकीस आला आहे. हा प्रकार करणाऱ्या रवी शेषराव आरके याच्या विरोधात सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने फिर्याद देण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीने पोबारा केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ३० जून २०२१ रोजी नगर परिषद अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, राहुल राजपूत, विशाल पाटील, ओम लहाने, व ईतर कर्मचारी शहरातील सराफा मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत असतांना अनिल बळीराम सोनार यांचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकामाची रितसर परवानगी घेतल्या शिवाय बांधकाम न करण्याच्या सूचना न.प.च्या अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. १३ ऑगस्ट २०२१ रोजी विलास सोमनाथ आरके यांनी अनिल सोनार यांच्यानावे सिल्लोड न.प. कार्यालयातील बांधकाम परवानगी, नकाशा आणि टॅक्स पावतीची झेरॉक्सप्रत नगर परिषदेत आणून दाखवली.

याबाबत शंका आल्याने परवानगीची शहानिशा व पडताळणी केली असता सदरील परवानगी बनावट असल्याचे निदर्शनास आले. परवानगी कोणाकडून घेतली या बाबत विचारपूस केली असता ही परवानगी रवी शेषराव आरके यांनी आणून दिल्याचे विलास आरके आणि अनिल सोनार यांनी सांगितले. या प्रकाराबाबत नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकारी सुनील गोराडे यांनी सिल्लोड नगर परिषदेची फसवणूक होत असल्याचा कारणावरून आज शनिवार ( दि.१४ ) सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून रवी शेषराव आरके व इतर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!