अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 21 वा सामना कोलकाता नाईट्स रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात कोलकाताने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला. कोलकाता विरुद्ध पराभूत झाल्यानंतर फलंदाज केदार जाधवला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
SRH vallu inko 3 crores raise chesunna kone vallemo ma vallu????#Jadhav anna meeda nammakam???? #CSK https://t.co/wQkE2tHH2w
— Rohith (@Rohith_SSMBFan) October 8, 2020
जाधव फलंदाजीसाठी आला तेव्हा चेन्नईला 21 चेंडूत 39 धावांची गरज होती. दुसरीकडे जडेजानं 8 चेंडूत 21 धावा केल्या, तर केदार जाधव मात्र सिंगल धावाही काढत नव्हता. चेन्नईला 10 धावांनी पराभव झाल्याचा विश्वास चाहत्यांनाही बसला नाही. त्यानंतर चाहत्यांनी केदार जाधवला ट्रोल करण्यात सुरुवात केली.
https://twitter.com/vijjuxi/status/1314129994138828801?s=20
केदार जाधवला रविंद्र जडेजा आणि ड्वॅन ब्राव्होच्या आधी बॅटिंगला का पाठवलं? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. केदार जाधव सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या कोलकात्याच्या स्पिनरवर वर्चस्व दाखवेल, असं आम्हाला वाटलं होतं. भारतासाठी केदार मधल्या आणि खालच्या फळीत खेळतो, असं फ्लेमिंग म्हणाले.
While watching yesterday match #Jadhav performance pic.twitter.com/p4wGLNEBxx
— Gowtham G Palraj – Say No To Drugs & DMK (@Gowthamadmk) October 8, 2020
आता केदारला टीममधून काढून टाका अशी मागणी जोर पकडू लागली आहे. काही जणांनी सोशल मिडीयावर केदार जाधवला सीएसकेमधून काढून टाकावं यासाठी सोशल मिडीयावर मोहीम उघडली आहे. यात त्यांनी केदारला संघात स्थान देऊ नका, तो आयपीएलमध्ये कसोटी क्रिकेट खेळतो, अशी टीका करण्यात आलीये.
महत्वाच्या बातम्या :-
- मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
- ‘आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंना भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं याचं आश्चर्य वाटतं’
- अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे- पियुष गोयल
- भारतीय कापसासाठी ऐतिहासिक दिवस; भारतीय कापसाला प्रथमच ब्रँड आणि लोगो मिळाला
- आमचं सरकार ‘सर्वधर्मसमभाव’ मानणारं परंतु केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – राष्ट्रवादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

