Share

‘मराठा समाजाच्या हितासाठी एकही बैठक न घेणाऱ्या चव्हाणांना अध्यक्ष पदावरून हटवा’

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. मात्र याआधीच मराठा क्रांती मोर्चा विरुद्ध अशोक चव्हाण असा वाद उभा राहिला आहे. अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हटवा अशी, मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळणे आवश्यक आहे. यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणं महत्त्वाचं आहे. परंतु अद्यापही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही.

जर बैठकीचं आयोजन करण्यात येणार नसेल तर अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हटवा अशी, मागणी केरे-पाटील यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.याबाबतच पत्र देखील केरे पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवले आहे. दरम्यान, यानिमित्ताने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. चव्हाण यांना खरंच मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचे गांभीर्य आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

केरे पाटील याचं नेमकं काय म्हणणे आहे ?

मराठा समाजाच्या हितासाठी अशोक चव्हाण यांनी आजपर्यंत एकही बैठक घेतलेली नाही. मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी एकाही नामवंत वकिलाची नियुक्ती केलेली नाही. लवकरात लवकर जर मराठा समाजाच्या हितासाठी आजपर्यंत अशोक चव्हाण यांनी काय निर्णय घेतले हे जाहीर करावे अथवा त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदावरून हकालपट्टी करावी. जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर आम्ही 9 ऑगस्ट रोजी मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात उभं करु..

पालकत्वाची जबाबदारी निभावण्यात केंद्र अपयशी: अशोक चव्हाण

टीकटॉक वर भारतात बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

उद्धवसाहेब…! आम्ही तुमच्याकडे उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय – संजय राऊत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!