Share

टीकटॉक वर भारतात बंदी आणा, रामदास आठवलेंची मागणी

Published On: 

मुंबई : चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर भारताने केला पाहिजे. भारतात 15 करोड लोक वापरत असलेल्या टिकटॉक या चिनी व्हिडीओ ऍप मुळे चीनला कोट्यावधींचा फायदा होतो. ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीनच्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे तसेच चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी. माझी सर्व भारतीयांना नम्र विनंती आहे की त्यांनी चिनी व्हिडियो ऍप टिकटॉकचा बहिष्कार करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

भाजपला कॉंग्रेसचा धोबीपछाड, ‘या’ राज्यातील सरकार संकटात

चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले त्यात 20 भारतीय शूर जवान शहीद झाले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आम्ही करीत असून उद्या धोकेबाज राष्ट्र असणाऱ्या चीनच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून रिपाइं चे कार्यकर्ते चीन च्या राष्ट्रध्वज जाळून चीन चा राज्यात सर्वत्र निषेध करणार आहेत.अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.

‘ठाकरे सरकार’च्या अजब फतव्याला सुप्रीम कोर्टाचा जबर दणका…

चीन विरोधात देशात संतापाची लाट उसळली असताना चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचा विचार पुढे येत असताना महाराष्ट्र्र राज्य सरकार ने चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीशी पुण्यातील तळेगाव येथे स्पोर्ट कार बनविण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी 7 हजार 600 कोटींचा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला आहे. हा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित रद्द करावा आणि चीन ची आर्थिक कोंडी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!