Share

एमिव्हे बंटाय सोबत ख्रिस गेलचं ‘जमैका टू इंडिया’ गाणं रिलीज

Published On: 

चेन्नई : सध्या भारतात आयपीएलचा ‘रण’संग्राम सुरु आहे. ९ एप्रिल पासून आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली. आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे. यावेळी हे दोन्ही संघ विजयाच्या हेतूने मैदानात उतरतील. स्टीवन स्मिथऐवजी संजू सॅमसनकडे राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्याच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व लोकेश राहुल करणार आहे.

सामना सुरु होण्याआधीच चाहत्यांना मैदानावर युनिव्हर्स बॉस गेलच्या चौकार-षटकाराची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, पंजाब किंग्सच्या पहिल्या सामन्यापूर्वी गेलचं ‘जमैका टू इंडिया’ हे गाणं रिलीज झालं आहे. रॅपर एमिव्हे बंटाय  याच्यासोबत गेलनं हे गाणं गायलं आहे आणि हे गाणं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. त्यात गेल नाचताना दिसत आहे.

हे गाणं इंग्लिशमध्ये गेलनं, तर हिंदीत एमिव्हेनं गायलं आहे. याला संगीत टोनी जेम्स यानं दिलं आहे. एमिव्हेनं हे गाणं यूट्यूब चॅनेलवर रिलीज केलं आणि आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांनी ते पाहिलं आहे. ख्रिसच्या गाण्याला भारतीय चाहत्यांनी बरीच पसंती दर्शवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!