Share

मुख्यमंत्री साहेब या जबाबदारीतून मला मुक्त करा, कॉंग्रेसच्या बड्या मंत्र्यांच्या भूमिकेने खळबळ

Published On: 

नागपूर : सारथी संस्था आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापत चालले आहे. सारथी संस्थेबद्दल वक्तव्य केल्यामुळे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका होत आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी ‘याबद्दल राजकारण करत माझ्यावर आरोप होत असेल तर मला यातून मुक्त करा’ अशी भूमिकाच मांडली आहे.

मराठा समाजाची दिशाभूल विजय वडेट्टीवार करत आहेत – मराठा क्रांती मोर्चा

‘सारथीची स्वायत्तता कुठेही संपलेली नाही. सारथीचं काम उत्तम पणे सुरू आहे. पत्रकार परिषद घेणारी भाजपचीच टोळकी आहेत,’ अशा आक्रमक शब्दांमध्ये विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.

तसंच, ‘सारथी संस्थेबाबत माझी भूमिका दुटप्पी आहे, असे आरोप केले जात आहे. पण मी सारथीबाबत कोणतीच नकारात्मक भूमिका घेतली नाही. मी ओबीसी समाजाचा नेता असल्यामुळे माझ्यावर हे आरोप केले जात आहे’ असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

तसंच, ‘या संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न मी केला आहे. तरीही माझ्यावर असे आरोप होत असेल तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती करणार की, राजकारण करत माझ्यावर आरोप होत असेल तर मला यातून मुक्त करा त्या ऐवजी या पदाची जबाबदारी एखाद्या मराठा नेत्याला द्या’ असं स्पष्ट मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान, मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

‘मागील सरकारने आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता,तो सरकारने पाळावा असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

कोर्टाच्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. विजय वडेट्टीवार या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत. सारथी संस्थेची छळवणूक सुरु आहे. विजय वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!