Share

कोर्टाच्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Published On: 

पुणे : मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

महाविकास आघाडीत बिघाडी नाही म्हणणाऱ्या थोरातांचा दावा २४ तासात सेनेने ठरवला खोटा

‘मागील सरकारने आमच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या होत्या. विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय. सारथीची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. विजय वडेट्टीवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनावेळी जो शब्द दिला होता,तो सरकारने पाळावा असे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन रखडले आहे. विजय वडेट्टीवार या खात्याला न्याय देऊ शकत नाहीत. सारथी संस्थेची छळवणूक सुरु आहे. विजय वडेट्टीवार यांनी या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भेदभाव केला जात आहे, असा आरोपही यावेळी केला.

‘भविष्यात निम्मी शिवसेना राष्ट्रवादी- काँग्रेस पोखरणार हे माझे शब्द लिहून ठेवा’

विजय वडेट्टीवार यांच्याकडून कार्यभार काढून दुसऱ्या कार्यक्षम मंत्र्यांकडे कार्यभार दिला जावा, अशी मागणी यावेळी मराठा मोर्चाकडून करण्यात आली. तसंच मराठा क्रांती मोर्चा वडेट्टीवार यांचा निषेध करतोय, मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या कोर्टाच्या निकालात काही दगाफटका झाला तर आम्ही सरकारला धडा शिकवू, आंदोलनाची वेळ आमच्यावर आणू नका, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!