🕒 1 min read
मुंबई : यंदाच्या टी-२० वर्ल्डकपपूर्वी न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी (Daniel Vettori )कडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हटोरीशिवाय आंद्रे बोरोवेकचीही ऑस्ट्रेलियन संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी ही माहिती दिली. हे दोघेही दिग्गज मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्यासोबत काम करतील.
”हा खूप मजबूत संघ आहे आणि या संघात खूप पुढे जाण्याची क्षमता आहे. मी यशस्वी कार्यकाळासाठी उत्सुक आहे”, असे व्हेटोरीने सांगितले. व्हेटोरी जगातील महान लेफ्ट आर्म स्पिनर्सपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंडसाठी ११३ कसोटी आणि २९८ एकदिवसीय सामने खेळले आणि या काळात त्याने भरपूर विकेट्स घेतल्या.
New Zealand cricket great Daniel Vettori joins Australia's new coaching staff https://t.co/4xHf0S2NjG
— The Guardian (@guardian) May 24, 2022
व्हेटोरीने यापूर्वी अँड्र्यू मॅकडोनाल्डसोबत काम केले आहे. या दोन्ही दिग्गजांनी आयपीएलमध्ये एकत्र आरसीबी संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. व्हेटोरी याआधी आरसीबीकडून खेळला आणि कर्णधारपद भूषवले आणि नंतर संघाचा प्रशिक्षक झाला. त्यादरम्यान त्याने मॅकडोनाल्डसोबत काम केले. या कारणास्तव, या दोघांची जोडी खूप फायदेशीर ठरू शकते कारण त्यांना यापूर्वी एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
