Share

IPL 2023 साठी एबी डिव्हिलियर्स सज्ज..! चाहत्यांना दिली ‘ही’ खुशखबर; नक्की वाचा!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामाचे (IPL 2023) वेध सर्वांना लागले आहे. या हंगामात बीसीसीआय आणि टेलिव्हिजनला आयपीएलमधून प्रत्येक वेळी जितका टीआरपी मिळतो तितका मिळाला नाही. याचं एक मोठं कारण हेही होतं की यावेळी आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेलसारखे तगडे फलंदाज नव्हते. पण आता पुढच्या वर्षी डिव्हिलियर्स आरसीबी संघात परतणार आहे, त्यानेच ही माहिती दिली

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, डिव्हिलियर्सने सांगितले, की तो आयपीएल २०२३मध्ये नक्कीच पुनरागमन करेल. डिव्हिलियर्सने मात्र आपली भूमिका उघड केली नाही. मात्र तो केवळ आरसीबीशीच जोडला जाईल, असेही त्याने सांगितले. व्हीयू स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, ”खरे सांगायचे तर, आम्ही अद्याप काहीही ठरवलेले नाही. मी पुढच्या वर्षी आयपीएलच्या आसपास नक्कीच असेल.”

आयपीएलमध्ये डिव्हिलियर्सने २००८मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून पदार्पण केले. ३ वर्षे दिल्लीत खेळल्यानंतर २०११मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याचा संघात समावेश केला होता आणि तेव्हापासून तो या संघासोबत होता. येत्या हंगामातही तो आरसीबी कॅम्पमध्ये दिसणार आहे. डिव्हिलियर्सने आरसीबीला पाच वेळा प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत केली होती. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आरसीबीला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!