अहमदनगर : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड होऊन 3 महिने उलटले तरी अद्याप यातील मुख्य आरोपी बाळ बोठेचा काहीही पत्ता लागलेला नाही. त्यामुळेच आता रेखा जरे यांच्या मुलावर उपोषणाला बसण्याची नाविलाजाने वेळ आली आहे.
रुणाल जरे याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत, अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. बाळ बोठेला तातडीने अटक करा अशी मागणी रुणाल जरे याने केली आहे.
काही महिन्यांपूर्वी रेखा जरे या कुटुंबा सोबत पुण्याहून नगरकडे आपल्या कार मधून परतत असताना वाटेत जातेगाव घाटात त्यांच्या कारला मोटारसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी अडवले आणि तुमच्या कारच्या आरशाचा कट मारल्याचा कांगावा करत सुरुवातीला हुज्जत घातली त्याच दरम्यान आरोपींनी रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला, यात रेखा जरे यांचा अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला.
भांडणाच्या दरम्यान जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने एका आरोपीचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढला होता. हाच फोटो पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेला आणि सुरुवातीला दोन हल्लेखोर, तर या कटात सहभागी असलेले इतर तीन आरोपी अशा पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
या पाच आरोपींची चौकशी दरम्यान रेखा जरे हत्याकांडाचा मुख्यसूत्रधार मास्टरमाइंड वरिष्ठ पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे असल्याचे उघड झाले. मात्र पोलीस त्याच्या पर्यंत पोहचेपर्यंत तो फरार झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार असल्याचा भाजपचा दावा
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे.जे. रुग्णालयात घेतला कोरोना लसीचा डोस
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- ‘या अल्लाह, आमच्या PSLला कुणाची नजर लागली’ ; ‘या’ ट्विटनंतर भारतीयांनी घेतली शाळा
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

