Share

Sanjay Raut | “राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. अशातच उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपाला थेट आव्हानच केलं आहे.

“राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”, असं आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला केलं आहे. ते म्हणाले, “१९ तारखेला विधानसेभेचे अधिवेशन आहे. त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावे लागेल. आशिष शेलार म्हणतात, ‘अरे’ ला ‘कारे’ करतो. मात्र, आधी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवात जाऊन त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कीटं न खाता त्यांना विचारा ‘कारे’ तुम्ही शिवरायांचा अपमान करता?”

“आधी ‘कारे’ तिथे विचारा, मग बाकीच्या गोष्टी करा. पण तुमच्या मनगटात तेवढी ताकद नाही. रोज उठून शिवरायांचा अवमान करता, त्यांचा इतिहास तुडवता”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानाबाबतही भाजपाला सुनावलं.

”शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, काल भाजपाने नवा शोध लावला आहे. त्यांनी शिवनेरीवर फुली मारली आहे. इतिहासातून शिवनेरी काढून टाकले आहे. मुळात त्यांना शिवाजी महाराज तरी मान्य आहेत का?” यांच उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!