Share

खेळाडुनंतर आता ‘या’ समालोचकाने मधेच सोडली आयपीएल स्पर्धा

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली भारतात यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही खेळाडूनी स्पर्धा सुरु असताना मध्येच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यात भारताचा फिरकीपटू आर अश्विननेही स्पर्धा मध्येच सोडत कुटूंबाला प्राधान्य दिले.

खेळाडु नंतर आता आयपीएल सामन्याचे समालोचन करणारा एक भारताचा माजी क्रिकेटपटूनेही स्पर्धा मध्येच सोडली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू रुद्रप्रताप सिंगने हा बायोबबल मधुन बाहेर पडला आहे. आरपी सिंगच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थीती त्यांची काळजी घेण्यासाठी व कुटुंबासोबत राहण्यासाठी आरपी सिंगने समालोचकांच्या बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आर पी सिंग हा आयपीएलमध्ये हिंदी समालोचन गटाचा एक भाग होता.

मात्र वडिलांची तब्येत ठीक झाल्यानंतर तो पुन्हा परतणार का? याविषयी काही माहिती मिळु शकली नाही. भारतात कोरोनाची परिस्थीती बघुन ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू टाय याने कोरोनापेक्षा आयपीएलला जास्त महत्त्व दिले जात असल्या कारणाने आयपीएलमधून नाव मागे घेतले. तर, आरसीबीसाठी खेळणाऱ्या ॲडम झम्पा व केन रिचर्डसन यांनीदेखील कोरोनाचे कारण सांगत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. तर राजस्थान रॉयल्सचा खेळाडू लियाम लिव्हींगस्टोनने बायो बबलला कंटाळून आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!