Share

दिलासादायक बातमी: ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना कागदपत्रांच्या मुदतीत वाढ

Published On: 

मुंबई : रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने सामन्य माणसाना दिलाद्सा देणारी माहिती दिली आहे.  ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना, नोंदणी यासह इतर कोणत्याही कागदपत्रांची वैधता वाढवाण्यासाठी सरकारने मुदत वाढवली असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारने कागदपत्रांची वैधता वाढवण्याची मुदत सप्टेंबर 2021 पर्यंत केली आहे.

या आधी देखील लॉकडाऊन आणि संबंधित निर्बंधांमुळे या कागदपत्रांची वाढवण्याची मुदत ही पाच वेळा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता सहाव्या वेळीही सरकारने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोटार वाहन कायदा 1988 आणि मध्यवर्ती मोटर वाहन नियम 1989 च्या अंतर्गत ही वैधता वाढण्यात आली आहे.

रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना, नोंदणी यासारख्या ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपत होती, त्यांची वैधता आता सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच वाहन दुरुस्ती, सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी, वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी यासंबंधी कागदपत्रांची वैधता ही 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कागदपत्रे तपासणारे अधिकारी 30 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करू शकणार नाही. त्यामुळे एकंदरीत या निर्णयामुळे अनेकांना दिला मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!