Share

‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन् वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा’, भाजपचा राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेश राज्यातील शिवसेनेने तेथील २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तसे पत्रकच स्थानिक नेत्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी काढले होते. शिवसेना उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, या घोषणेला ४८ तासही होत नाहीत तोवर शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. उत्तर प्रदेशात आम्ही ८० ते १०० जागा लढवू अशी घोषणा राऊत यांनी केलीये.

‘उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू,’ अशी भूमिका राऊतांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना मांडली.

राऊतांच्या या भूमिकेवरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. ‘२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे.’ या शब्दांत भातखळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, काही तासांतच पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक शेकडो उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व जागा लढवण्याची घोषणा करूनही राऊतांनी यु टर्न घेत १०० जागांची तयारी असल्याचे सांगितले आहे. यावरून पक्षात अंतर्गत धुसफूस तर सुरू नाही ना अशी एक चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय आपणच घेत असल्याचे राऊत यांना अप्रत्यक्षपणे दाखवायचे आहे म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले असावे अशी देखील एक शक्यता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!