Share

‘पंचनामे न करता शेतकऱ्यांना तत्काळ व सरसकट मदत करा’, खा.चिखलीकरांची मागणी

Published On: 

नांदेड : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे.

राज्यात यंदा अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं आलेल्या मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालेलं आहे. १९८३ नंतर यंदा प्रथमच यंदा मोठा प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पंचनामे करून वेळ वाया घालू नये. शेतकऱ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीय.

खा.चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासन सध्या नदीच्या काठावर असलेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. अतिवृष्टीने खरिपाच्या पिकांना खूप मोठा फटाका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट मदत करावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!