मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे चेहरा असणारे आणि आंदोलनादरम्यानच वेगवेगळ्या अडचणीत सापडलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. मुंबईतील गावदेवी येथील पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. सदावर्ते यांच्यावर पाच गुन्हे दाखल असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे हे गुन्हे दाखल आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 110 अंतर्गत कारवाई करण्यास सुरू केली आहे. गावदेवी पोलिसांकडून विशेष अधिकारनुसार ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. सदावर्ते यांच्यावर सध्या पाच गुन्हे दाखल असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोला आणि पुणे येथे हे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही सदावर्ते यांनी पुन्हा असे गुन्हे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नोटीस राजकीय हेतून प्रेरित – सदावर्तेंचे वकील :
सदावर्ते यांच्या वकिलांनकडून सांगण्यात आले आहे की, जी नोटीस पाठवण्यात आलेली आहे ती राजकीय हेतून पाठवण्यात आली आहे. या नोटिशीच्या आशयानुसार समाजात एखाद्या व्यक्तीला मोकळं सोडणं धोक्याचं आहे, अशा गंभीर कलमांतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पण कोर्टात गोष्टी न्यायप्रविष्ट असताना आणि अद्याप काहीही सिद्ध झालेलं नसताना, अशा प्रकारची नोटीस पाठवणं म्हणजे हा कोर्टाचा अवमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


