टीम महाराष्ट्र देशा : राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम नुकताच थंडावला आहे. मात्र या रणसंग्रमातून नवीन वादाला तोंड फुटले आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात युती धर्म न पाळता अपक्ष उमेदवार व जावई हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप औरंगाबादचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर मला रावसाहेब दानवे यांच्या कडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली होती. मात्र आता हर्षवर्धन जाधवांची प्रचारादरम्यानची एक क्लिप वायरल झाल्याने दानवे आता अडचणीत आले आहेत.
या क्लिप मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंचा मला संपूर्ण पाठींबा असल्याचे भाष्य केले आहे. हर्षवर्धन जाधव यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. दानवेंनीच पूर्ण भाजप माझ्यामागे उभं करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा दावा हर्षवर्धन जाधवांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता रावसाहेब दानवे आता चांगलेच अडचणीत आल्याच दिसत आहे.
दरम्यान या लोकसभा निवडणुकीला भाजप आणि शिवसेना हे युती करून निवडणुकीला सामोरे गेले. मात्र औरंगाबाद मध्ये रावसाहेब दानवे यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याशी कमालीचे मतभेद असताना देखील युती धर्म पाळला आहे. त्यामुळे आता भाजप – सेना युतीमध्ये मिठाचा खडा पडतोय की काय हे पहाण औत्सुक्याच ठरणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

