टीम महाराष्ट्र देशा:- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणत पक्षांतर सुरु आहे .याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम ठोकलेल्या रविकांत तुपकर यांनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत याच्या रयतक्रांती या पक्षात प्रवेश केला होता.
परंतु तेच रविकांत तुपकर आता एक महिना होत नाही तेच आता परत घर वापसी करणार आहेत. रविकांत तुपकर हे पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. कोल्हापुरात रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

