🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ज्ञ यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. यामधील काही मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या, माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. आज (रविवारी) सह्याद्री अतिथिगृहावर ही हाय व्होल्टेज बैठक पार पडलेली आहे.
कोर्टातील स्थगितीनंतर मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र या बैठकीला केंद्रीय केंद्रीय न्याय व विधी मंत्री रवीशंकर प्रसाद अनुपस्थितीत राहिले. या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय मंत्रीच उपस्थित नसल्याने बैठकीतील इतर सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याची माहिती समोर येत आहे.
रवीशंकर प्रसाद यांच्या अनुपस्थितीबाबत हरकत घेण्यात आल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिलं. ‘केंद्रीय न्याय व विधी मंत्री अशा बैठकीस उपस्थितीत राहिले तर ते एका बाजूने आहेत असा चुकीचा मेसेज जाऊ शकतो. त्यामुळे ते उपस्थितीत नाहीत,’ असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका देखील करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून मराठा आरक्षण टिकवण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही असे आरोप देखील केले जात आहेत. अशात येत्या काही दिवसांत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत पुढील सुनावणी सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्यांनाकडून १७ हजारांचा दंड वसूल
- विदर्भाच्या ‘संजय; च्या जागेवर मराठवाड्यातील ‘संजय’ला मंत्रिपद ?
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
