Share

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं – फडणवीस

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या प्रसंगी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले.

यावरून आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेसह राष्ट्रवादीला देखील लक्ष्य केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राऊतांच्या विधानावर भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्रातील नेता देशाचं नेतृत्व करत असेल तर आम्हाला आनंदच आहे,’ असं पवार यांनी म्हटलंय.

फडणवीसांच्या ठाकरेंना फोनद्वारे शुभेच्छा –

फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांना मी फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करत त्यांनी जनतेची जास्तीत जास्त सेवा करावी, अशा शुभेच्छा फडणीस यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!