Share

अखेर युद्ध जिंकलेचं : शेवटच्या रुग्नाचा अहवाल निगेटिव्ह आला; ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्त झाला

Published On: 

रत्नागिरी : कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल १ महिना झाला संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना रुग्नांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आपल्या आरोग्य रात्रंदिवस काम करत आहे.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सहा महिन्याच्या बाळाचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. या अहवालातून त्याला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे रत्नागिरीत आता एकही कोरोनाबाधीत रुग्ण नाही.

दरम्यान, १९ मार्चला रत्नागिरीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून एकूण सहाजणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यातील शृंगारतळीचा पहिला रुग्ण, राजीवडा येथील दुसरा रुग्ण पूर्ण बरे झाले. खेड येथे एका रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला आणि त्याचवेळी त्याचे निधन झाले.

मिरज येथे पाठविण्यात आलेल्या रुग्णांच्या नमुन्यांचे अहवाल जिल्ह्यात प्राप्त होत आहेत. रात्री उशिरा सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने कोरोना विरुधातील युद्ध अखेर जिंकले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!