अबुधाबी : अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानने आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अबुधाबी येथे झिम्बाब्वेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने या विक्रमाला गवसणी घातली. राशिद खान हा २१व्या शतकातील कसोटी सामन्यात राशिद सर्वात जास्त षटके गोलंदाजी करणारा गोलंदाज बनला आहे.
अफगाणिस्तानचा स्टार युवा फिरकीपटू राशिद खानने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात या नव्या विक्रमाची नोंद केली आहे. राशिदने या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात एकूण ९९.२ षटके गोलंदाजी केली आणि ११ गडी बाद केले. पहिल्या डावात ३६.३ ओव्हर गोलंदाजी करत १३८ धावा देत चार गडी बाद केले तर दुसऱ्या डावात ६२.५ षटके गोलंदाजी करत १३७ धावा देत ७ गडी बाद केले
या आधि विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर शेन वॉर्नच्या नावावर होता. शेन वॉर्नने २००२ मध्ये ९८ षटके गोलंदाजी केली होती. तर श्रीलंकेचा ऑफस्पिनर गोलंदाज आणि कसोटीतील सर्वाधिक विकेट घेणारा मुथय्या मुरलीधरनने १९९८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात ११३.५ षटके गोलंदाजी केली होती आणि १६ गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका रद्द करा अन्यथा आत्महत्या करेल ; गुजरातमधील एका व्यक्तीची पोलिसांना धमकी
- संसदेत घुमला पुण्याचा आवाज, चव्हाण-बापटांनी गाजवला दिवस
- बुमराहच्या पत्नीचे पुणे कनेक्शन! ‘या’ महाविद्यालयातून घेतले शिक्षण
- ऑलम्पिकमध्ये क्वॉलीफाय करुन भवानी देवीने रचला इतिहास
- टी 20 पदार्पणानंतर मुंबईकर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

