Share

बुमराहच्या पत्नीचे पुणे कनेक्शन! ‘या’ महाविद्यालयातून घेतले शिक्षण

Published On: 

पुणे : भारताचा आघाडीचा गोलंदाज यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह सोमवारी विवाह बंधनात आडकला. व्यवसायाने अँकर असलेल्या संजना गणेशनसोबत त्याने लग्न केले. एरव्ही मैदानावर भल्याभल्याना यॉर्कर टाकून क्लिन बोल्ड करणाऱ्या बुमराहची विकेट संजनाने काढली. सोशल मीडीयावर या नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बुमराहची पत्नीने आपले शिक्षण पुण्यातील सिंबॉयसीस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये पुर्ण केले आहे. संजनाचे वडिल हे ‘अलाना इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’ या संस्थेत डायरेक्टर म्हणून काम पाहतात. संजना एक अँकर आहे व तिला आयपीएल दरम्यान अनेक वेळा बुमराहला प्रश्न विचारताना चाहत्यांनी पाहिले आहे.

२०१४ साली ती मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचली होती. तिने २०१३ साली फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार देखील जिंकला होता. ती सोशल मीडियावर सतत पोस्ट करत असतो. तसेच ती या माध्यमांचा खुबीने वापर करते. क्रिकेट व्यतीरिक्त संजनाने फूटबॉल व बॅडमिंटन खेळांच्या शोमध्ये देखील होस्ट म्हणून काम पाहिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!