Share

ऑलम्पिकमध्ये क्वॉलीफाय करुन भवानी देवीने रचला इतिहास

Published On: 

टोकीयो : भारताची आंतरराष्ट्रीय महिला तलवारबाज भवानी देवीने इतिहास रचला आहे. टोकियो येथे २३ जुलै पासुन सुरु होणाऱ्या ऑलम्पिकसाठी तिने क्वॉलीफाय केले आहे. ऑलम्पिक मध्ये सहभाग घेणारी ती भारताची पहिली महिला तलवारबाज ठरली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी टि्वट करुन भवानी देवीचे आभिनदंन केले आहे.

बुडापेस्ट विश्वचषक ही ऑलिम्पिक क्वालिफायिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेत चेन्नईच्या २७ वर्षीय भवानीने रविवारी शानदार प्रदर्शन करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली. भवानीच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. आशिया ओशनिया समूहामध्ये ऑलिम्पिकच्या दोन जागा होत्या. जपानच्या तलवारदाराला पहिली जागा मिळाली तर, दुसरी जागा भवानीला मिळाली, असे फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस बशीर अहमद खान यांनी सांगितले आहे.

भवानी देवीचा परिचय

भवानी देवीने आठ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली आहे. कॉमनवेल्थ चैम्पियनशिप मध्ये तिने एक रजत आणि कांस्य पदक कमावले आहे. २०१० च्या एशियन तलवारबाजी स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले होते. २०१४ च्या आशीयाई स्पर्धेत एकेरी मध्ये रजत, तर कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!