Share

अखेर विराट कोहलीनेही केलीच “पुष्पा स्टाईल”; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मोहाली येथे तीन दिवसांत संपलेली भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास होती. भारतासाठी १०० कसोटी सामने खेळणारा तो १२ वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आणि कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ८,००० धावाही पार केल्या. मोहाली कसोटीत भारताने केवळ एका डावात फलंदाजी केली असली, तरी कोहलीने मैदानावर मस्ती करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

सध्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वात लोकप्रिय ट्रेंड म्हणजे अल्लू अर्जुनचा (allu arjun)  ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पा (pushpa) . चित्रपटाच्या संवादांपासून ते गाण्यांपर्यंत चित्रपटाचा प्रत्येक पैलू चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. मोहाली कसोटी सामन्यात कोहलीही (virat kohli) अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील आयकॉनिक मूव्ह करण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. त्याचा “पुष्पा स्टाईल” व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने त्याच्या १००व्या कसोटी सामन्यात ४५ धावा केल्या. त्याचे या सामन्यात तरी ७१ वे शतक येईल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र , विराट अर्धशतकही पूर्ण करू शकला नाही. तसेच भारताला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची गरजही पडली नसल्याने चाहते थोडे निराश झाले होते. विराटने मात्र फलंदाजीची कमी पूर्ण करत आपल्या मजेशीर कृत्याने चाहत्याने आनंदित केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!