🕒 1 min read
अमरावती: अमरावतीतील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवी राणा यांनी १२ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. पण तो पुतळा प्रशासनाने रात्रीतून काढल्याने वाद निर्माण झाला होता. आता तो वाद विकोपाला गेला आहे. काही महिलांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याची ही घटना समोर आली आहे. राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवला होता. यामुळे बराच वाद झाला असतानाच आता अमरावती प्रशासनाने हा पुतळा या ठिकाणाहून काढला होता. त्यासंबंधी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आमदार रवी राणा यांनी मनपाने पुतळा बसवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र मनपाने ती नाकारली.
महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर करण्यात आलेली ही शाईफेक त्याच कारवाईचे पडसात असावेत असा अंदाज आहे. तर शाई फेक करणाऱ्या महिला या खासदार नवनीत राणांच्या कार्यकर्त्या असाव्यात असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. पोलिसांनी सावरासावर केली मात्र, त्या महिला तेथून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. आयुक्तांच्या अंगरक्षक तिथे उपस्थित होते. त्यांनी घटना घडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
